जयदत्त क्षीरसागारांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात धनंजय मुंडेसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावले

टीम महाराष्ट्र देशा – बीड येथे आज (बुधवारी) नगर परिषदेच्या सभागृहाला लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब नामकरण करण्यात आले आहे. यानंतर शासकीय रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाले आहे.

Loading...

या कार्यक्रमानंतर मात्र शहरात राष्ट्रवादीच्या आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या नेत्यांना बोलवत राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावले असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला पहावयास मिळत आहे.


यावेळी नगर परिषदेच्या अंतर्गत अमृत भुयारी गटार योजनेचे भुमिपुजन, नगरोत्थान सिंमेट रोडचे भुमिपुजन, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ४४८ घरांच्या निर्मितीचे भुमिपुजन व मराठवाड्यातील पहिल्या निवारागृहाचे लोकार्पण तसेच नगर परिषद सभागृहाचे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब सभागृह नामकरण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, पालकमंत्री पंकजाताई मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थिती हा कार्यक्रम संपन्न झाला.


देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे नेते आमदार जयदत्त क्षीरसागर माझ्याकडे आले आणि म्हणाले, मला बीडचा चेहरामोरा बदलायचा आहे, त्यासाठी मी त्यांना 495 कोटी रुपये दिले. मोदी सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. बीडकरांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरं देणार आहे.कोणताही गरीब कच्च्या घरात राहणार नाही. ग्रामीण भागात पाच लाख घरं पूर्ण झाली आहेत. राष्ट्रवादी विकास करतं नाही फक्त राजकारण करते.’

या कार्यक्रमाला पद्यश्री वामन केंद्रे, शब्बीर शेख, पैहलवान राहूल आवारे, क्रिकेटर सचिन धस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आ. विक्रम काळे, आ. सुरेश धस, भिमराव धोंडे, आ. आर.टी.देशमुख, नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर, विभागीय आयुक्त भापकर, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. येडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे उपस्थित होते.

1 Comment

Click here to post a comment







Loading…










Loading…

Loading...