आघाडी-महायुतीचे उमेदवार श्रीतुळजाभवानी चरणी!

तुळजापूर- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्रीतुळजाभवानीच्या चरणी आशीर्वाद घेण्यासाठी भक्तांची कायम गर्दी असते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयाचा आशीर्वाद कौल मिळावा व तो घेण्यासाठी राजकीय मंडळी निवडणूक पुर्वी तुळजापुरात गर्दी करतात. उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी कडून आ.राणा जगजितसिंह पाटील व सेना-भाजपा आघाडी कडून माजी आ.ओमराजे निंबाळर यांच्या नावाची उमेदवारी जाहीर होताच दोन्ही उमेदवारींनी तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे येवुन देवीदर्शन घेवून आपआपल्या विजयाचे साकडे घातले.

या आधी सेनेकडून प्रा. रविंद्र गायकवाड यांनी तुळजापूर येथे देवीदर्शन घेवून प्रचाराचा शुभारंभ केला होता. माञ नंतर त्यांना डावलून माजी आ. निंबाळकर यांना जाहीर होताच त्यांनी रविवार दि 24 रोजी मातोश्रीवरुन थेट रविवारी श्रीतुळजाभवानी दारी येवुन देवीदर्शन घेतले .

दरम्यान,राष्ट्रवादीकाँग्रेस काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ राणा जगजितसिंह पाटील यांनी सोमवार दि 26 रोजी सपत्नीक पहाटे श्रीतुळजाभवानीचे देवीदर्शन घेवून विजयासाठी साकडे घातलं. यावेळी जि.प.उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील प्रभारी नगराध्यक्ष बापुसाहेब कणे उपस्थितीत होते.

श्रीतुळजाभवानी आता विजयाची कवड्याची माळ कुणाच्या गळ्यात घालणार हे मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहे. पण दोन्ही उमेदवार देवी विजयाचा कौल आपल्याच देईल या आशेने प्रचारात मग्न असणार आहेत.