‘अमित शहांसारख्या नेत्यांमुळेच कोरोनाचा प्रसार वाढला’; राकेश टीकैतांचा घणाघात

rakesh vs amit shah

दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचा संघर्ष अजून देखील सुरु आहे. गेले अनेक महिने उलटून देखील आंदोलक शेतकरी हे दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. भारतीय किसान युनियनचे नेते आणि प्रवक्ते राकेश टिकैत या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आंदोलन प्रभावित झाले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असून, आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी राकेश टिकैत यांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे.

या भेटीदरम्यान शेतकरी आंदोलनाचं स्वरुप, बंगालमधल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर पत्रकारांशी राकेश टिकैत यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. शेतकरी आंदोलनामुळे कोरोनाचा फैलाव वाढतोय असं वाटत नाही का, असा प्रश्न टिकैत यांना विचारण्यात आला. तेव्हा आम्ही मोठी मिटींग घेतली नाही. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याचा प्रश्नच नाही.

आम्ही सगळेजण कोरोना नियमांचं पालन करुन आंदोलन करत आहोत. पश्चिम बंगाल निवडणुकांच्या कालावधीत कोरोनाचा भरपूर फैलाव झाला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या रॅली, बैठका झाल्या आणि त्यामुळे कोरोनाच आणखीनच पसरला, असा आरोप करत ममता बॅनर्जी नंदीग्राममधून निवडणूक लढवणार आहेत, याची मला कल्पना नव्हती, असा दावाही टिकैत यांनी केला आहे.

दरम्यान, राकेश टिकैत आणि ममता बॅनर्जी यांची भेटीमुळे एक वेगळेच राजकीय समीकरण तयार होऊ शकते, अशी चर्चा आहे. ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीपासूनच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांची भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP