मोदी सरकारवर टीका करणारे नेते, अभिनेत्यांचे ट्विट्स ब्लॉक

ट्विटर

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे अभुतपूर्व संकट निर्माण झाले आहे. वाढती रुग्णसंख्या आणि तोकड्या आरोग्य सुविधांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यामुळे अनेक जण आपला राग व्यक्त करत आहेत. काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर हल्लाबोल केला आहे. पण सरकारवर टीका करणाऱ्या काही नेते व अभिनेत्यांसह अनेकांच्या ट्विटवर कारवाई करण्यास केंद्राने ट्विटरला सांगितलं. त्यावरून काही अकाऊंटवरील ट्विट्स ब्लॉक करण्यात आलेत.

खासदार रेवंथ रेड्डी, पश्चिम बंगालचे मंत्री मुलोय घातक, अभिनेता विनीत कुमार सिंह, चित्रपट निर्माते विनोद कापरी, अविनाश दास यांच्यासह काहींनी कोरोना आणि कुंभमेळ्यावरून सरकावर टीका केली होती. सरकारच्या विरोधात ट्विट असल्याने केंद्र सरकारने ट्विटर इंडियाला नोटीस बजावली होती. त्यानंतर नमूद करण्यात आलेले ट्विट ब्लॉक करण्यात आलेत. ब्लॉक करण्यात आलेले ट्विट भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग करणारे होते, असं ट्विटरने म्हटलं आहे.

दरम्यान, विदेशातून केलेले ट्विटस अद्यापही दिसत आहे. केवळ भारतातून केलेले ट्विट्स ब्लॉक करण्यात आलेत. विशेष म्हणजे ब्लॉक केलेले ट्विट हे ट्विटर प्लॅटफॉर्मवरून काढण्यात आलेले नाहीत. ते केवळ भारतातच प्रतिबंधित करण्यात आलेत. विदेशातील नागरिक संबधित ट्विट पाहू शकतात असे ट्विटरने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या