आता काही खरं नाही… कार्यकर्त्यांनीच काढली नेत्यांची धिंड

blank

टीम महाराष्ट्र देशा : भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्याला सार्वजनिक ठिकाणी काळे फासले. हे कार्यकर्ते इतक्यावरच थांबले नाहीत, त्यांनी चप्पलचा हार घालून त्यांना गाढवावर बसवून फिरवल्याची घटना राजस्थानमध्ये घडली आहे.

राजस्थानातील बसपाचे राष्ट्रीय समन्वयक रामजी गौतम आणि माजी प्रदेश प्रभारी सीताराम मेघवाल यांची बसपाच्याच नाराज कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळे फासून, गळ्यात चप्पल,बुटाचा हार घालून गाढावरवरून धिंड काढली. हा सर्व प्रकार मंगळवारी(ता. २२ ) सकाळी जयपुर येथील बसपाच्या मुख्यालयाच्या परिसरात घडला. कार्यकर्त्यांचे म्हणणे पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यापर्यंत पोहोचवत नाही तसेच ते भ्रष्टाचार करतात, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

”पक्षाचे कार्यकर्ते आपल्या नेत्यांवर नाराज आहेत. कार्यकर्ता पाच वर्षे मेहनत करतो. पण नेता पैसे घेऊन भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांना तिकीट देतात. बसपा कार्यकर्ते आणि नेत्यांकडे दुर्लक्ष केले जाते, त्यांचे शोषण केले जाते. ” असे एका कार्यकर्त्याने म्हंटले आहे. दरम्यान, मायावती ट्वीट करत यांनी घटनेचा निषेध करताना काँग्रेसवर आरोप केला आहे. ”काँग्रेसने पहिल्यांदा राजस्थानमध्ये बसपा आमदारांना फोडले आणि आता चळवळीचे नुकसान करण्यासाठी वरिष्ठ लोकांवर हल्ले करत आहेत. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. ” असे मायावतींनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :