…हा तर प्रा.राम शिंदेंचा उतावीळपणा – राधाकृष्ण विखे-पाटील

vikhe patil

भागवत दाभाडे/ अहमदनगर : नगर जिल्ह्याचे विभाजन करण्याची पालकमंत्री राम शिंदे यांनी केलेली घोषणा भूलथापा करणारी व उतावळेपणाची आहे, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिंदे यांच्या जिल्हा विभाजनाच्या घोषणेची खिल्ली उडविली.

कोल्हार व भगवतीपूर (ता. राहाता) येथील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजनानंतर बोलताना विखे पाटलांनी जिल्हा विभाजनाच्या घोषणेवर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की राज्यातील भौगोलिकदृष्ट्या सर्धिवा क मोठ्या असलेल्या नगर जिल्ह्याची सर्वांगीण वाढत चाललेली व्याप्ती व कारभार, त्याचा सर्वच घटकावं र पडत असणारा ताण याची मला माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्याचे विभाजन करण्यास माझा विरोध व दुमत नाही. विभाजनाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून व वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर चर्चेत येत असतो. परंतु विभाजनाची घोषणा म्हणजे पालकमंत्र्यांनी स्वतःची लोकप्रियता वाढविण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न दिसतो. वास्तविक जिल्हा विभाजनाची मागणी करणाऱ्या सर्व घटकाशी समन्वय साधून व सर्वांचे एकमत करूनच त्यावर पालकमंत्र्यांनी भाष्य करणे गरजेचे होते. जिल्ह्यातील स्वतंत्र मुख्यालयासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परंतु पालकमंत्र्यांच्या या घोषणेमुळे जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक प्रश्न मिटण्याऐवजी ते अधिक चिघळण्यास मदत होईल, अशी भीती विखे पाटील यांनी व्यक्त केली.

शिंदे हे नव्यानेच मंत्री झाले आहेत, असे उपरोधिकपणे म्हणत विखे म्हणाले, ‘‘त्यांनी कोणतेही विधान करण्यापूर्वी त्या विषयातील गांभीर्य समजावून घेतले पाहिजे. मंत्रिपद असूनही त्यांना जिल्ह्याची पार्श्वभूमी माहीत नसावी, यासारखे दुर्वदै नाही.’’शेतजमिनीचा पुरेसा मोबदला न मिळाल्यामुळे धर्माराव हे वृद्ध शेतकरी शासनदरबारी हेलपाटे मारून थकले. त्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. शेतकऱ्यांची आत्महत्या करण्याची मालिका सुरूच आहे. यावरून सरकारची शेतकऱ्यांविषयीची असंवेदनशीलता स्पष्ट होते. सरकारला शेतकऱ्यांविषयी आस्था राहिलेली नाही, अशी टीका विखे यांनी केली. सरकारी प्रशासकीय कार्यालयांचे डिजिटलायझेशन करून लोकांच्या गैरसोयी कमी करण्यास मदत होईल व भ्रष्टाचारही थांबेल,अशी व्यवस्था करावी लागेल, असे विखे पाटील म्हणाले.Loading…
Loading...