fbpx

इंटरनेट बंद केल पण लाखो लोकांचा आवाज कसा दाबणार – धनजंय मुंडे

औरंगाबाद: राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सरकार विरोधात काढण्यात आलेल्या मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेचा आज औरंगाबादमध्ये समारोप होत आहे. यावेळी जाहीर सभेच आयोजन करण्यात आल होत. मात्र अचानक सर्व इंटरनेटसेवा बंद झाल्याने विरोधीपक्षाचा आवाज दाबण्यासाठी सरकारकडून याप्रकारचे राजकारण केल जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सरकारने सभेच्या ठिकाणची इंटरनेट सेवा बंद केली असली तरी लाखोंच्या संख्येने जमलेल्या समुदायाचा आवाज सरकार दाबू शकत नसल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

धनंजय मुंडे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यात कॅबिनेट बैठक घेतली होती. त्यात घेतलेल्या ३७ शासन निर्णयांपैकी एकाही निर्णयाची अंमलबजावणी आजपर्यंत केलेली नाही.

औरंगाबाद येथे प्रस्तावित असलेले आयआयएमसुद्धा नागपूरला पळवण्यात आले.

राज्यात तरुणांना कुठेही रोजगार नाही. नोकरभरती बंद झालेली आहे. फक्त सरकारमधील मंत्र्यांची घर’भरती सुरू आहे

अच्छे दिनाच्या नावाने फसवणूक, कर्जमाफी, रोजगार, बोंडअळीची मदत, स्मारक, आरक्षणाच्या नावानेही या सरकारने फसवणूक केली.

अधिकारी, डॉक्टर ते एसटी कामगारापर्यंत सर्वच संपावर गेले. आता या फसव्या सरकारला संपावर पाठवायची वेळ

राज्य सरकारने आंदोलनाचा धसका घेतला म्हणूनच कालपर्यंत पोलीस प्रशासनाने आजच्या सभेला परवानगी नाकारली

3 Comments

Click here to post a comment