राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राज्यपालांच्या भेटीला, सरकार स्थापनेसाठी मिळाले निमंत्रण ?

blank

टीम महाराष्ट्र देशा : दिलेल्या वेळात शिवसेना बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरली असल्याने राज्यपालांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी बोलावलं असल्याची माहिती सूत्रांकडून आली आहे. तसेच राज्यपालांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना राजभवनावर बोलावून घेतले आहे.

याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आ. अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली आहे. ते म्हणाले की, राज्यपालांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना राजभवनावर बोलावले आहे. मात्र सरकार स्थापनेचे अधिकृत निमंत्रण दिलेले नाही. त्यामुळे राज्यपालांनी राजभवनावर का बोलावले आहे हे माहित नाही, असे अजित पवारांनी सांगितले आहे.

राज्यपालांच्या बोलवण्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजभवनाकडे रवाना झाले आहेत. अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदि नेते राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत.

दिलेल्या वेळात शिवसेना बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरली आहे. कॉंग्रेसच्या पाठींब्या अभावी शिवसेनेला बहुमत सिद्ध करता आलेले नाही. तर कॉंग्रेसच्या बैठकीत शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत अजूनही अधिकृत संमती मिळालेली नाही. त्यामुळे शिवसेनेला बॅक फुटवर यावे लागले आहे. त्यामुळेशिवसेनेच्या सत्ता स्थ्पानेच्या मनसुब्याला काँगेसने सुरुंग लावले असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राज्यपाल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सरकार स्थापनेसाठी संधी देणार असल्याचं बोललं जात आहे.

शिवसेनेला रविवारी राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले होते. तर आज सायंकाळी ७ : ३० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र शिवसेनेला बहुमत सिद्ध करता आलेले नाही. काँगेसच्या शिवसेनेला पाठींबा देण्याचा निर्णय अद्याप झाला नसल्याने शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा दावा फोल ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या