fbpx

भाजपात प्रवेश करणाऱ्या लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर बलात्काराचा आरोप

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादीचे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी जालना येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. परंतु लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे

२०१४ मध्ये त्यांच्याच शिक्षण संस्थेतील एका महिलेने हा आरोप केला होता. या तक्रारीवरून बोरिवली पोलीस ठाण्यात ढोबळे यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. हे आरोप बिनबुडाचे आणि राजकीय सुडापोटी करण्यात आल्याचा आरोप ढोबळे यांनी केला होता.

बोरिवलीमधील गोराई भागात लक्ष्मणराव ढोबळे यांच्या शाहू शिक्षण संस्थेचे नालंदा महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात तक्रारदार महिला लिपीक म्हणून कार्यरत आहे. २०११मध्ये तिची संस्थेच्या इमारतीचे पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तिने बोरिवली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार जानेवारी २०११ ते फेबुवारी २०१३ या कालावधीत ढोबळे यांनी तिच्यावर बलात्कार केला असल्याचे आरोप केले होते. या तक्रारीनुसार जानेवारी २०११मध्ये ढोबळे यांनी तिला जमिनीची काही कागदपत्रे घेऊन पाहणीसाठी बोलावले आणि प्राचार्याच्या दालनात नेऊन मारहाण करत बलात्कार केला. याची वाच्यता केल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही दिली. नोव्हेंबर २०११ मध्ये तुझी अश्लील छायाचित्रे कुटुंबीयांना दाखवेन, अशी धमकी देत भेटायला बोलावून पुन्हा बलात्कार केला. अशाच प्रकारे फेब्रुवारी २०१३ मध्येही ढोबळे यांनी बलात्कार केल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले होते. त्यावेळी ढोबळे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी ढोबळे यांनी मोठा आटापिटा केला. या केसचा निकाल नुकताच त्यांच्या बाजूने लागला असल्याचे कळते आहे.

2 Comments

Click here to post a comment