Breaking : वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्तेपदाचा लक्ष्मण मानेंनी दिला राजीनामा

पुणे : ‘वंचित आघाडीमुळे भाजपचाच फायदा होत आहे. वंचितमध्ये आरएसएस आणि भाजपच्या लोकांनी घुसखोरी केली आहे,’ असं म्हणत वंचितचे नेते लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा द्यावा, अशी मागणी लक्ष्मण माने यांनी केली आहे.

आपण प्रवक्तेपदाचा राजीनामा आंबेडकर यांच्याकडे सोपवला असून आपण आंबेडकरांबरोबर काम करू शकत नाही, असा उल्लेख असलेले पत्र आंबेडकर यांना पाठवल्याचे माने म्हणाले. वंचितचे बहुसंख्य कार्यकर्ते आपल्या बरोबर असल्याचा दावाही माने यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकरांनी आमचा वापर केला. त्यांच्याद्वारे अजूनही भारिपचं काम सुरू आहे,’ असा आरोप लक्ष्मण मानेंनी केला आहे.