राष्ट्रवादीचे माजी मंत्री गडकरींच्या चरणी

laxman dhobale

टीम महाराष्ट्र देशा- भाजप प्रवेशासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पाया पडतानाचा फोटो सध्या मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे. माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी मंगळवारी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आशीर्वाद घेतले.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कारही केला. गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण ढोबळे यांची भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी धडपड सुरु आहे मात्र भाजपच्या वरिष्ठांनी त्यांना वाट पाहण्याचा संदेश दिला होता . आता हा फोटो समोर आल्यानंतर ढोबळे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत.

ढोबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावर येणार होते, त्यावेळी ढोबळे प्रवेश करतील असा अंदाज होता. मात्र, फडणवीस यांचा दौरा रद्द झाला. ढोबळे स्वतः आपण भाजपात प्रवेश करणार असल्याचे काही दिवसांपासून सांगत आहेत. मात्र, त्यांच्यावरील एका गुन्ह्याचा निकाल लागायचा असल्याने प्रवेश रखडला असल्याचेही त्यांनी वेळोवेळी सांगितले आहे. विशेष म्हणजे ढोबळे शिवसेना नेत्यांच्या देखील संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती.Loading…
Loading...