‘चुकीची’ कामे करता येईना म्हणूनच सरन्यायाधीशांवर आरोप, सुप्रिम कोर्टातील वकिलाचा गौप्यस्फोट

टीम महाराष्ट्र देशा: सरन्यायाधीश रंजन गोगोईं यांच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे देशात खळबळ उडाली आहे, एका महिलेने सुप्रीम कोर्टाच्या 22 न्यायाधीशांना पत्र लिहित. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपले लैंगिक छळ केला असल्याचा आरोप केला आहे.

गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून विशेष सुनावणी घेण्यात आली. यावेळी गोगोई यांनी २० वर्ष न्यायसंस्थेत काम केल्याचं हे फळ आहे का? 20 वर्षानंतर आजही माझ्या खात्यात फक्त 6 लाख 80 हजार रुपये आहेत. माझ्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्याकडेही माझ्याहून अधिक पैसे आहेत. माझ्यावर कोणीही आर्थिक आरोप करु शकत नाही. त्यामुळे असे आरोप केले जात असल्याचं भावनिक उत्तर दिले होते.

न्यायसंस्थेला बळीचा बकरा करता येणार नाही. काही लोकांना ही संस्था बरखास्त करायची आहे. यासाठीच अशाप्रकारचे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. असं गोगोईंनी यावेळी सांगितले होते.

दरम्यान, आता सर्वोच्च न्यायलयातील वकिल उत्सव बैंस यांनी गोगोई यांची बदनामी करण्याची आपल्याला देखील ऑफर होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. उत्सव बैंस यांनी फेसबुक पोस्ट लिहित सर्व सत्य समोर आणले आहे.

उत्सव बैंस यांची फेसबुक पोस्ट