खा. उदयनराजे भोसले असो कि आ. शिवेंद्रराजे दोघांनाही कायदा समान: नांगरे-पाटील

टीम महाराष्ट्र देशा : खा. उदयनराजे भोसले व आ.शिवेंद्रराजे भोसले दोन्ही राजांना कायदा समान आहे, गुरुवारी रात्री साताऱ्यामध्ये घडलेल्या घटनेतील सर्व दोषींना कठोर कारवाई करणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली आहे. गुरुवारी मध्यरात्री आनेवाडी येथील टोल नाकाच्या प्रकरणावरून दोन्ही राजेंचे कार्यकर्ते भिडले होते. दरम्यान या प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी घटनेनंतरची परिस्थिती योग्यप्रकारे हाताळली असून पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी बजावलेल्या कर्तव्यासाठी रिवॉर्डचा प्रस्ताव देण्याची सूचना करण्यात आल्याचही नांगरे पाटील यांनी सांगितल आहे.

गुरुवारी झालेल्या हाणामारी प्रकरणी आता पोलिसांनी देखील आपल्या बाजूने तक्रार दाखल केल्याने भविष्यात याप्रकरणात तडजोड होवू शकत नाही. तसेच घटनेवेळी फायरिंग झाले असून पोलिसांनी दोन पुंगळ्या जप्त केल्या असल्याचही विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितल आहे. दरम्यान घटनेत सहभागी असणारे कुठेही पळाले तरी अटक तर करणारच, असा इशाराही नांगरे-पाटील यांनी दिला आहे.

You might also like
Comments
Loading...