कायदा-सुव्यवस्था राज्य सरकराचा अधिकार आहे : शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषद, भीमा कोरेगाव प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यानंतर केवळ २४ तासात केंद्र सरकारने ही केस राज्यसरकारकडून काढून घेतली. त्यावर शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधत काही खुलासे केले आहेत.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, पुण्यातील शनिवार वाड्यात झालेल्या एल्गार परिषदेत जी भाषणे झाली ती त्यांच्यावर झालेलाअन्याय आणि अत्याचाराबाबत आपल्या तीव्र भावना व्यक्त करणारी भाषणे होती. अन्याय आणि अत्याचाराविरुध्द भावना व्यक्त करण्याने ते लगेच नक्षलवादी किंवा माओवादी होतात, हे खरे नाही. तसेच या सर्व प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. हे दाखल केलेले गुन्हे सत्यावर आधारित नाहीत, त्यामुळे मला स्वतःला असे वाटते की या सर्व प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करणे गरजेचे आहे.

Loading...

तसेच या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र कमिटी नेमण्यात यावी. आणि यांनी या सबंध प्रकारणाची फेरतपासणी करावी. त्यातून सत्य बाहेर येईल आणि हीच मागणी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्यानंतर त्याची एक प्रत गृहमंत्र्यांनादेखील पाठवली. त्यानंतर या सर्व प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलावली. त्या बैठकीनंतर अवघ्या चार ते पाच तासात केंद्र सरकारने ही सबंध केस राज्यसरकारकडून काढून घेत आपल्या एजन्सी कडे दिली. कायदा-सुव्यवस्था राज्य सरकराचा अधिकार आहे, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

एनआयएचा कायदा आल्यानंतर केंद्राला काही जास्तीचे अधिकार आले आहेत, हे मला मान्य आहे पण राज्य सरकारने  जर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी काही पावले उचलली असतील  तर केंद्राने घाईघाईने हे प्रकरण काढून घेण्याचे कारण काय, असा प्रश्न विचारत त्यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'