fbpx

चांगल्या पक्षाने उमेदवारी दिल्यास पुणे किंवा मोहोळ मतदारसंघातून निवडणूक लढविणार

पुणे : चांगल्या पक्षाची उमेदवारी मिळाली की विधानसभा निवडणूक लढविणार असून मी पुणे किंवा मोहोळ मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असल्याचे लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी सांगितले. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्तालाप कार्यक्रमात सुरेखा पुणेकर यांनी आपली राजकीय इच्छा बालून दाखविली.

‘लावणी अमेरिकेत जाऊ शकते, तर मी विधानसभेत जाऊन लोककलावंतांचे प्रश्‍न का मांडू शकत नाही, असा सवाल करून लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी मंगळवारी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली. लावणीला आता पारंपरिक प्रेक्षक राहिला नाही. लावणी टिकविण्यासाठी सध्या अनेक समस्या सोडविणे गरजेचे आहे. या समस्या सोडविण्यासाठी मला लावणीचे प्रश्न विधानसभेत मांडायचे आहेत असं देखील त्या म्हणाल्या .