LAVA Z10- तीन जीबी रॅमयुक्त लाव्हा झेड १०

लाव्हा कंपनीने आपले झेड १० हे मॉडेल आता तीन जीबी रॅमसह लाँच केले असून याचे मूल्य ११,५०० रूपये इतके ठेवण्यात आले आहे.

लाव्हा झेड १० हे मॉडेल आधी दोन जीबी रॅमसह सादर करण्यात आले होते. आता तीन जीबी या वाढीव रॅमसह याची नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत उतारण्यात आली आहे. यात पाच इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा २.५ डी वक्राकार आयपीएस डिस्प्ले असेल. यात अतिशय गतीमान असा ऑक्टा-कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. यात १६ जीबी इनबिल्ट स्टोअरेज प्रदान करण्यात आले असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर आधारित स्टार ओएस या प्रणालीवर चालणारा आहे. यातील मुख्य कॅमेरा ८ तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. सुपर पॉवर सेव्हर मोडसह यातील बॅटरी २६२० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची देण्यात आली आहे.