राज्यपालांच्या हस्ते ‘वेब नागपूर’ वेबसाईटचे लाँचिंग

koshyari

नागपूर : सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी ‘वेब नागपूर’ ही वेबसाईट तयार केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या ‘वेब नागपूर’ या वेबसाईटचे लाँचिंग केले आहे. दरम्यान यावेळी राज्यपाल यांनी समाजासाठी निःशुल्क सुरु केलेल्या या वबसाईटला शुभेच्छा दिल्या आणि अजित पारसे यांच्या उपक्रमाचे कौतुकही केले आहे.

आता या वबसाईटवर लहान मुलांच्या लसीकरणासाठीची माहितीही देण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात लहान मुलांना लस कुठे आणि कशी मिळेल, लसीकरण केंद्र कुठले आणि प्रशासनाचे आवाहन अशी सर्व माहिती यावर देण्यात येणार आहे.

यासोबतच लाईट बिल भरणे, कर भरणे, तक्रार करणे, तिकीट काढणे, गॅस सिलिंडर बुक करणे यासारखी कामेही ‘वेब नागपूर’ या वेबसाईटवरून करता येणार आहेत. खेड्यापाड्यातल्या लोकांना ऑनलाई व्यवहार कळावे, रोजच्या जीवनात आपल्या गरजांसाठी इंटरनेटचा सहज वापर करता यावा, यासोबतच सर्वसामान्य नागपूरकरांनी ऑनलाईन सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, यासाठी ‘वेब नागपूर’ ही वेबसाईट सुरु केल्याचे सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या