न्यू Porsche 911 भारतात लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्ये

टीम महाराष्ट्र देशा : Porsche ने त्यांची आइकॉनिक स्पोर्ट्स कार Porsche 911 नव्या रुपामध्ये भारतात लॉन्च केली आहे. ही कार दोन प्रकारांमध्ये (Carrera S आणि Carrera S Cabriolet) उपलब्ध आहे. 1.82 करोड़ आणि 1.99 करोड़ रुपये (एक्स शोरूम) अशी क्रमश: या कारची किंमत आहे. ही कंपनीची 8वीं जेनरेशन Porsche 911 स्पोर्ट्स कार आहे .

नव्या पोर्श 911 मध्ये अपेडेटेड 3-लीटर, ट्विन-टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजन आहे. हे इंजन 450PS ची पावर आणि 530Nm पीक टॉर्क जनरेट करते. जुन्या मॉडल च्या तुलनेत हि नवी कार 30PS अधिक पावर जेनरेट करते. यामध्ये 7-स्पीड मैन्युअल गियरबॉक्स चे देखील ऑप्शन दिले आहे. कंपनी ने दावा केला आहे की , नवी Porsche 911 Carrera S केवळ ३.७ सेकंदात ० ते १०० किलोमीटर प्रती तास इतका वेग पकडू शकते. ३०८ किलोमीटर प्रती तास हा कारचा टॉप स्पीड आहे. कारचा लुक देखील खूप आकर्षक आहे. ग्रे, व्हाईट, रेड, ग्रीन अशा ट्रेंडी कलर मध्ये ती उपलब्ध आहे.