५९.२० लाखांची BMW 530i M Sport भारतात लॉन्च

टीम महाराष्ट्र देशा : लग्जरी कार कंपनी BMW ने 530i M स्पोर्ट कार भारतात लॉन्च केली आहे. आणि ही कार देशातील सर्व शोरूममध्ये उपलब्ध होईल. कारची एक्स शोरुम किंमत ५९.२० लाख इतकी आहे. हि कार एम स्पोर्ट पॅकेजमध्ये उपलब्ध आहे, नवीन बीएमडब्लू 530i एम स्पोर्ट चार कलर्स मध्ये उपलब्ध आहे. व्हाइट, ब्लॅक, ब्लू आणि मेटेलिक कलर मध्ये ती उपलब्ध आहे.

काय आहे खासियत BMW 530i M Sport ची

नवीन 530i एम स्पोर्ट मध्ये बोल्ड किडनी ग्रिल दिलेले आहे. आणि त्यात इतर एलिमेंट्स म्हणून ब्लॅक हाई-ग्लोस दिला आहे जो स्पोर्टी लुक सोबत येतो. एम स्पोर्ट पॅकेज मध्ये एक फ्रंट एपरॉन सह मोठ्या एअर इंटेक्स, साइड स्कर्ट ट्रिम आणि एक डिफ्यूज़र -स्टाइल रियर अपरॉन दिले आहे. याव्यतिरिक्त त्यात क्रॉल टेलपाइप्स आणि 18-इंच लाइट एलॉय व्हील्स दिले आहेत.

नवीन बीएमडब्ल्यू 530i एम स्पोर्ट मध्ये बीएमडब्लू कनेक्टेड ड्राईव्ह सिस्टम सारखे मल्टीफंक्शनल इंस्ट्रूमेंट डिस्प्ले दिला गेला आहे.त्याचबरोबर कार 10.25 इंच बीएमडब्लू नेव्हिगेशन सिस्टमसह 16 लाउड स्पीकर्ससह Harman Kardon चे 600 वॉट हाय-एंड अँड सराउंड साऊंड सिस्टम, BMW अँप्स, वायरलेस अँप्पल कारप्ले आणि ब्लूटूथ आणि यूएसबी कनेक्टिव्हिटी दिली आहे.

2 Comments

Click here to post a comment