प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ‘डाॅ. हंसराज हाथी’ यांचं निधन

टीम महाराष्ट्र देशा : सब टीव्ही वरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील डाॅ. हंसराज हाथीची भूमिका साकारणारे अभिनेते कवी कुमार आझाद यांचं आज मुंबईत ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले.

गेल्या तीन दिवसांपासून कोमामध्ये होते. त्यांच्यावर मिरारोडच्या वोकहार्ड हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कवी कुमार आझाद यांची डाॅ. हंसराज हाथी ही भूमिका प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली. ‘सही बात है’  हा त्यांचा फेमस डायलाॅग अगदी घराघरात पोहचला. सगळ्यांना खळखळून हसवणारे हाथी भाईचं असं अकस्मात जाणं मनाला चटका लावणार आहे.

कवी कुमार आझाद यांनी २०१० मध्ये ८० किलो वजन कमी केलं होत. आमीर खानच्या ‘मेला’ आणि ‘फंटूश’ या सिनेमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.

ह्र्दय विकाराच्या झटक्याने प्रचारादरम्यान भाजप उमेदवाराचे निधन

मी जो काही आहे तो महाराष्ट्रामुळेच – अक्षय कुमार

माजी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली