मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे लातूरकर तहानलेले

लातूर : मागील काही दिवसांपासून कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या लातूर महानगर पालिकेला जाग आली आहे. तब्बल सात कोटी कर थकल्यानंतर आता कुठे जाऊन मनपा कामाला लागली आहे. अचानक सुरु केलेल्या कारवाईमुळे उद्योजकांनी उद्योग बंद करू पण कर भरणार नाही. अशी भूमिका घेतल्याने सध्या लातूरकरांचा पाणी प्रश्न गंभीर झाल्याचे पाहायला मिळते.

आधीच लातुरात पाणीप्रश्न ऐरणीवर असताना महानगरपालिकेच्या ढिसाळ कामामुळे लातूरकरांना येणाऱ्या काळात मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. कुंभकर्णाच्या झोपेत असलेल्या मनपा प्रशासनाने एक यादी तयार केली आहे. तब्बल ३८३ लोकांचे या यादीत नाव आहे. विशेष म्हणजे त्यात मोठ्या राजकीय नेतेमंडळींच्या नावाचा उल्लेख आहे. या मंडळींनी तब्बल ७ कोटी थकवले आहेत. इतका मोठया प्रमाणावर कर थकत असतांना सुद्धा महापालिकेला जाग कशी आली नाही ? अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे का? अधिकारी कारणीभूत असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

हा कर थकल्यामुळे लातूरकरांचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. येणाऱ्या काळात मनपा प्रशासनमुळे होणाऱ्या गैरसोयीला जबाबाजार कोण असणार ? आता लातूरकरांना पाणी मिळणार का? असा प्रश्न सध्या प्रत्येक लातूरकराला पडलेला दिसतोय. हा कर येत्या काहीदिवसात जमा न झाल्यास लातूरकरांचा पाणी प्रश्न गंभीर होण्याची शक्यता नाकारत येत नाही हे मात्र नक्की.

महत्त्वाच्या बातम्या

IMP