‘तो’ आरोपी माझा सुरक्षारक्षक नाही; निलंगेकरांचा खुलासा    

लातूर : लातूरमध्ये ‘स्टेप बाय स्टेप’ या क्लासच्या संचालकावर गोळ्या झाडणारा आरोपी, मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांचा  माजी सुरक्षारक्षक असल्याचं समोर आलं आहे. या बातमीमुळे अवघ्या मराठवाड्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी क्लास संचालक अविनाश चव्हाण हत्या प्रकरणात ज्या पाच जणांना अटक केली आहे, त्यात कॅबिनेट मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा माजी सुरक्षारक्षक करण सिंह याचा समावेश असल्याचं समोर आलं आहे.

दरम्यान निलंगेकरांनी हा दावा फेटाळून लावला आहे. अविनाश चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी करण सिंह धैरवाल आपला सुरक्षारक्षक नव्हता, असा खुलासा  मंत्री संभाजी पाटील निलंगेकरांनी केला आहे. तो आपल्या विधानसभा मतदारसंघातला कार्यकर्ता असल्याचं त्यांनी यावेळी म्हंटलं.