लातूर मनपा; पाणीपुरवठ्यावर खर्च केले १२ कोटी अन् वसुल फक्त दीड कोटी

लातूर: भर उन्हात कोरोना पादुर्भाव वाढत असताना लातूर महापालिका पाणीपट्टी न भरणाऱ्यांचे नळ तोडण्याचा निर्णय घेतला आहे. लातूर शहरवासियांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला दरमहा साधारण १ कोटी खर्च येतो. म्हणजे, वर्षाला १२ कोटी रुपये लागतात. तर दुसरीकडे लातूरकरांनी २०२०-२१ या वर्षाची केवळ १ कोटी ५७ लाख रुपये पाणीपट्टी भरली आहे. पाणीपुरवठ्यावर होणाऱ्या खर्चाच्या कितीतरी पट लातूरकरांनी चालू वर्षाचीच पाणीपट्टी थकविली आहे.

२०१० पासूनची ५४ कोटींची थकबाकी वेगळीच आहे. त्यामुळे मनपा आयुक्त अमन मित्तल यांच्या मागदर्शनाखाली प्र्रशासनाने आता गंभीरपणे वसुली मोहीम राबविण्याचे नियोजन आखले आहे. लातूर शहराला मांजरा धरणातून व मांजरा नदीवरील साई आणि नागझरी बंधाऱ्यावरुन पाणीपुरवठा केला जातो. या तिन्ही ठिकाणच्या पाणीपुरवठा योजनांसाठी दरमहा ६० लाखांचे वीजबिल भरावे लागते, तर शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी ब्लिचिंग, तुरटी व अन्य साहित्यावर साधारण १० लाख रुपये खर्च होतात आणि पाणीपुरवठ्याची यंत्रणा राबविण्यासाठी कर्मचाऱ्यांना साधारण ३० लाखां पगार करावा लागतो. अशा प्रकारे दरमहा १ कोटी रुपये खर्च पाणीपुरठ्यावर केला जातो. मात्र लातूरकर पाणीपट्टी भरताना धावत नाहीत, हे २०२०-२१ च्या पाणीपट्टी वसुलीवरुन दिसते

लातूर शहरात जवळपास ६० हजार नळधारक आहेत. त्यात घरगुती, वाणिज्य व औद्योगिक नळ आहेत. या सर्वांककडे १ वर्षाला १० कोटी ५४ लाख रुपये पाणीपट्टीची मागणी आहे. तर, २०१० पासून ६० कोटी ९१ लाख म्हणजे १७ कोटी रुपये थकबाकी आहे. लातूर शहराला काही वर्षांपासून पाणीटंचाईला सामोर जावे लागल्याने व शहरांतर्गत वितरण व्यवस्थेतील दोषांमुळे आठवड्याला पाणीपुरवठा करावा लागला. आजही धरणात पाणीसाठा असताना आठवड्यातून एकदाच नळाला पाणी सुटते. महापालिका आर्थिक अडचणीत असतानाही पाणीपुरवठा करते.

महत्वाच्या बातम्या