लातूर : पाऊस थांबला, मतदानासाठी लागल्या रांगा

blank

लातूर : लातुरात सकाळपासून पावसाची संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू होता. पण पाऊस थांबताच शहरातील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनीही सुटकेचा निःश्वास टाकला.

शहरात मतदानाला सकाळी सात वाजता सुरवात झाली. पण पावसामुळे अनेकांना घराबाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळत होता. मतदानही संथ गतीने सूरु होते.

मतदान केंद्राबाहेर मदतीला धावुन येणारे पक्षांचे कार्यकर्तेही पावसामुळे गायब झाले होते; पण सकाळी अकरा वाजता पाऊस थांबला. त्यांनतर मतदारांची पावले मतदान केंद्राकडे वळू लागली. अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्रही पहायला मिळत होते. ज्येष्ठ नागरिकांबरोबरच तरुणांचा यात मोठ्या प्रमाणात समावेश होता. मतदान केंद्राबाहेरील गायब झालेले कार्यकर्तेही पाऊस थांबल्यामुळे पुन्हा मदतीला धावून आले.

महत्वाच्या बातम्या