लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चारा छावण्याबाबत पुढे येणे गरजेचे

लातूर (प्रतिनिधी) :  लातूर जिल्ह्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून पशूधनाच्या चा-याचा प्रश्न कमालीचा गंभीर झाला असल्यामुळे साखर कारखान्यांनी सामाजिक बांधीलकी विचारात घेवून सरकारच्या चारा छावण्या सुरु होण्याची वाट न बघता तात्काळ चारा छावण्या सुरु करुन जिल्ह्यातील शेतक-यांना मोठा दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक बगदूरे यांनी केली.

Loading...

‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना ते म्हणाले की,राज्य सरकारला दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात सपशेल अपयश आले आहे हे खरे आहे.परंतु या दुष्काळावरुन सध्या जिल्ह्यामध्ये मोठ राजकारण केलं जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.दुष्काळाच्या या भयावह संकटसमयी सत्ताधारी व विरोधकांनी आपले राजकीय हेवेदावे बाजूला सारुन एकमेकांच्या हातात हात घालून या दुष्काळाचा सामना करुन ग्रामीण जनतेला दिलासा दिला पाहिजे.जिल्ह्यात दुष्काळाने रौद्र रुप धारण केल्याने पाणी व चा-याचा प्रश्न कमालीचा बिकट झाल्याने ग्रामीण जनता कमालीची हवालदील झाली आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील साखर कारखाने,सामाजिक संस्था व देवस्थानांनी शेतकरी व शेतमजूरांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे मत बगदूरे यांनी व्यक्त केले.

लातूर जिल्ह्यासाठी दुष्काळ ही कायमची समस्या बनली आहे.ऊस,केळी या सारखी पिके आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घेतली जातात.या पिकांना ठिबक,तुषार सिंचन या अद्यावत पध्दतीने पाणी पुरवठा करणे काळाची गरज आहे.परंतु आपला शेतकरी आजही या अद्यावत पध्दती ऐवजी प्रवाही सिंचन या पारंपारीक पध्दतीने पाणी पुरवठा करत आहे.त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी ऊस व केळी या सारख्या पिकाच्या शेतीला पाणी देण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन पध्दती बंधनकारक करावी.

तसेच लोकचळवळीच्या माध्यमातून प्रवाही सिंचन पध्दती कायमची हद्दपार करुन जिल्ह्यात सिंचनाचा लातूर पँटर्न निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी पुढाकार घ्यावा.याकामी साखर कारखान्यांनी देखील आपले विशेष योगदान द्यावे.दुष्काळी परिस्थितीत निर्माण झाल्यानंतर केवळ प्रसिध्दीसाठी आरोप-प्रत्यारोप करुन राजकारण करणे यापुढे थांबवावे असे यावेळी बोलताना बगदूरे यांनी म्हंटले.Loading…


Loading…

Loading...