लातूर जिल्हा बँकेची मुख्यमंत्री निधीस १ कोटी ११ लाखांची मदत

लातूर : सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी सहकार क्षेत्रातील ऊत्कृष्ट बँक म्हणून गौरविण्यात आलेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कोरोना संसर्गा संदर्भात उपायायोजना करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता (कोवीड-१९) निधीस रू १कोटी ११ लाख एवढी आर्थिक मदत दिली आहे.

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने सामाजिक जाणीव ठेऊन अडचणीच्या काळात राज्य सरकारला भरीव मदत केली आहे सामाजिक जाणीव ठेवून केलेल्या हा निधी दिल्याबद्दल शासनाचा प्रतिनिधी म्हणून मंत्री अमित देशमुख यांनी आभार मानले आहेत.

देशमुख म्हणाले, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे, संचालक मंडळाचे आभार व्यक्त करतो आहे.लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेची वाटचाल शेतकरी आणि सामान्य माणसांच्या विकासासाठी लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या प्रेरणेने सुरू आहे. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या कुशल मार्गदर्शनाने जिल्हा बॅकेने अनेक लोकोपयोगी उपक्रम आणि योजना यशस्वी केल्या आहेत.

पुढे बोलताना देशमुख म्हणाले, ‘राज्यासह देशभरात कोरोना पा्रदुर्भावाने सर्व ठप्प् झाले आहे. राज्यसरकारला उपाययोजना राबविण्यासाठी अनेकांच्या मदतीची आवश्यकता आहे. सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी कोरोना विषाणूंमुळे होणाऱ्या आजारावर उपायोजना करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता (कोवीड-१९) निधीस रू १ कोटी ११ लाख एवढी आर्थिक मदत दिली आहे. बँकेचे हे कार्य कौतुकास्पद आणि अभिमानास्पद ही आहे’.