वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल लातूरचे डॉ. अशोक कुकडे यांना पद्म भूषण

वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मराठवाड्यात मोठे काम उभारणारे लातूरचे डॉ. अशोक कुकडे यांना पद्म भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डॉ कुकडे हे विवेकानंद रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे संस्थापक आहेत. डॉकुकडे यांना देशातील सर्वोच्च पुरस्कार जाहीर झाल्याने लातूरमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मूळ पुण्यातील असणारे डॉ अशोक कुकडे हे ग्रामीण भागात असणारा वैद्यकीय सेवेचा वणवा पाहता १९६५ मध्ये लातूरला गेले. कुकडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक देखील आहेत. मराठवाड्यामध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी संघानेच त्यांना पाठवल्याच देखील बोलल जात.

लातूर आणि मराठवाड्यातील अन्य भागात विवेकानंद हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी मोठे सेवाकार्य केले आहे. 1970 चा दुष्काळ, 1993 चा किल्लारी भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत मोठे काम केले. मराठवड्यातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध आहे.