‘युती होगी तो साथी को जितायेंगे, नही हुई तो पटक देंगे’ : अमित शाह

टीम महाराष्ट्र देशा : ‘वन प्लस वन टू नही होता, युती होगी तो साथी को जितायेंगे नही हुई तो पटक देंगे’, असं अमित शाह भाजप कार्यकर्त्यांना म्हणाले. आज लातूरमध्ये भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणुकी संदर्भातच बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

तीन राज्यांतील दारुण पराभवानंतर आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी-शहा जोडी पुन्हा एकदा मैदानात उतरताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज लातूरमध्ये भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणुकी संदर्भातच बैठक घेतली. या बैठकीमध्ये भाजप अध्यक्षांनी स्वबळाचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

‘वन प्लस वन टू नही होता, युती होगी तो साथी को जितायेंगे नही हुई तो पटक देंगे’, असं अमित शाह भाजप कार्यकर्त्यांना म्हणाले. शिवसेनेसोबत युती नाही झाली तरी ४८ पैकी ४० जागांवर भाजप उमेदवार निवडून येतील, ही तयारी भाजप कार्यकर्ते करतील, असं वक्तव्य शाह यांनी केलं.

You might also like
Comments
Loading...