योगींवर पडला लेटरबॉम्ब, उत्तरप्रदेशात खळबळ…

टीम महाराष्ट्र देशा : उत्तरप्रदेश मध्ये ८३ माजी अधिकाऱ्यांनी बुलंदशहरामध्ये झालेल्या घटनेचा तपास चुकीच्या पद्धतीने चालू असल्याचा, आरोप करत पत्र लिहून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे.अधिकाऱ्यांच्या या लेटरबॉम्बमुळे उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे.
इन्सपेक्टर सुबोध कुमार सिंह यांच्यासह दोन जणांच्या हत्याप्रकरणाचा तपास चुकीच्या दिशेने सुरू आहे असे त्या अधिकाऱ्यांचे मत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर लेटरबॉम्बचा वर्षाव करणारे हे ८३ अधिकारी ४ ते ५ वर्षांपूर्वीच निवृत्त झाले आहेत. पोलीस निरीक्षक सुबोध सिंह यांच्या हत्याप्रकरणाचा तपास करण्याऐवजी गोकशीच्या आरोपींच्या दिशेने या तपासाची दिशा वळवण्यात आल्याचा आरोप या अधिकाऱ्यांनी केला आहे.

You might also like
Comments
Loading...