लतादीदी तुम्ही लवकरचं ठणठणीत बऱ्या होणार आहात : राज ठाकरे

blank

टीम महाराष्ट्र देशा : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना ब्रीच कॅन्डी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. लता मंगेशकर यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर समस्त भारतीयांनी त्यांच्या प्रकृतीत लवकरचं सुधारणा व्हावी यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करत आहेत.

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून ट्विट केले आहे. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतोय, असा आशय राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये लिहिला आहे.

दरम्यान 90 वर्षीय लतादीदी यांना अद्यापही लाइफ सपोर्ट सिस्टीम म्हणजेच व्हेंटीलेटर ठेवण्यात आलं आहे. लता दीदी यांना हृदयातील जंतूसंसर्ग झालाय. असतातच लता दीदी यांना न्युमोनिया देखील झाला असल्याची माहिती आता समोर येतेय. म्हणूनच लता दीदींना ICU मधून अद्याप बाहेर काढण्यात येणार नाही.

महत्वाच्या बातम्या