नांदेड मध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज, एका विद्यार्थाचा मृत्यू

आंदोलनाला हिंसक वळण

टीम महाराष्ट्र देशा : भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाच्राराच्या निषेध म्हणून आज राज्यभर आंबेडकरवादी संघटनांनी आंदोलन केली. मात्र नांदेड मध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्ज मध्ये हदगाव तालुक्यातील एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

योगेश प्रल्हाद जाधव असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो दहावीत शिकत होता. तसेच वाळकीफाटा येथे दगडफेकीत कारमधून प्रवास करणारी चिमुकली जखमी झाली.

हिमायतनगरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्सच्या जवानांनी लाठीचार्ज केला. यामध्ये योगेश च्या मानेला फटका बसला त्याच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव सुरु झाल्याने त्यास हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.