आरक्षण कुणी काढून घेण्याचा प्रयत्न केल्यास थप्पड मारून पुन्हा मिळवा : कल्याण सिंग

टीम महाराष्ट्र देशा : आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क असून हा हक्क कुणी काढून घेण्याचा प्रयत्न केल्यास थप्पड मारून तो हक्क पुन्हा मिळवा.’ असा अजब सल्ला राजस्थानचे राज्यपाल आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी दिला आहे. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले कल्याण सिंग ?
‘आरक्षण मिळवण्यासाठी किती संघर्ष करावे लागले ते माजी पंतप्रधान दिवंगत व्ही. पी. सिंग यांना विचारा. त्यांनी तुमच्यासाठी मंडल आयोग लागू केला. त्यावेळी देशात काय परिस्थिती निर्माण झाली होती. लाठ्याकाठ्या, गोळ्या सर्वकाही वापरले गेले. रक्तसुद्धा वाहिले, परंतु त्यांनी कशाचीही पर्वा न करता मंडल आयोग लागू केला. त्यांच्यामुळेच तुम्ही आहात. त्यांनी तुम्हाला दिलेले हे हक्क कुणी कितीही काढून घेण्याचा प्रयत्न केला, तरी देखील तुम्ही ते त्यांना काढून घेऊ देता कामा नये. आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क असून हा हक्क कुणी काढून घेण्याचा प्रयत्न केल्यास थप्पड मारून तो हक्क पुन्हा मिळवा. ‘

‘दुर्दैवाने आरक्षण संपवण्याचा प्रयत्न झालाच तर एक मूठ आवळून उभे राहा आणि हा हक्क कुणीही हिरावून घेणार नाही यासाठी संघर्ष करा. जितकी आपली लोकसंख्या आहे, त्या प्रमाणात आपल्याला प्रतिनिधित्व मिळते का? लोकसंख्येच्या प्रमाणात उच्च पदांवरही आपल्या समाजातील अधिकारी नाहीत. कोणत्याही वर्गाला आरक्षण मिळो, आम्हाला त्याबाबत काही अडचण नाही, मात्र आमचे आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न झाल्यास आम्हाला फरक पडायचाच हवा. कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण आपल्या आरक्षणाचा हक्क आपण गमावता कामा नये असं देखील ते म्हणाले.Loading…
Loading...