संत तुकारामांचा खून झाला होता; जितेंद्र आव्हाड यांच्या विधानामुळे वारकरी संतप्त

टीम महाराष्ट्र देशा- संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा खून झाला होता असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या फेसबुक लाइव्ह दरम्यान केले होते. यावरून वाद निर्माण झाल्यावर त्यांनी आपले वक्तव्य फेसबुकवरून हटवले. मात्र त्यांच्या या वक्तव्याचा वारकरी संप्रदायाने निषेध नोंदवला आहे.

तुकाराम महाराजांचा खून झाला होता, असं आव्हाड फेसबुक लाईव्हमध्ये म्हणाले. त्यांच्या या विधानावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर आव्हाडांकडून वादग्रस्त विधान असलेला व्हिडीओ डिलीट करण्यात आला. आव्हाडांच्या विधानानं भावना दुखावल्याची प्रतिक्रिया वारकरी संप्रदायानं नोंदवली.

तुकाराम महाराजांबद्दल असं बोलण्याचं धाडस आव्हाडांनी केलंच कसं?, त्यांच्या या विधानाबद्दल त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, अशा प्रतिक्रिया वारकरी संप्रदायानं नोंदवल्या आहेत.तुकाराम महाराजांचा खून झाला होता असे वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी वारकरी पाईक संघाने केलेली आहे.

तुकाराम महाराजांचा खून झाला हे वारकरी संप्रदाय कधीही मान्य करू शकत नाही. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हे जर कोणाला मान्य करायचे नसेल तर त्यांनी ते करू नये पण त्यांच्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे आहे. आव्हाडांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणीही वारकरी संप्रदायाने केली आहे. वारकरी संप्रदायाच्या वतीने संत तुकाराम महाराजांचे 11 व्या पिढीतील वंशज ह.भ.प. चैतन्य महाराज देहूकर निषेधही नोंदवला आहे.

याआधी काल जितेंद्र आव्हाड यांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना मला गीता तोंडपाठ असल्याचं म्हटलं होतं. यावेळी एका पत्रकारानं त्यांना गीतेतील एक श्लोक म्हणण्यास सांगितलं. मात्र जितेंद्र आव्हाड यांना श्लोक पूर्ण करता आला नाही. याशिवाय त्यांचे अनेक उच्चारदेखील चुकले. यानंतर आव्हाड श्लोक म्हणण्यास सांगणाऱ्या पत्रकारावरच भडकले. तुम्ही नंतर बाजूला या. मी तुम्हाला श्लोक म्हणून दाखवतो, असं आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांनी संजय काकडेंची अक्कल काढली

पाकिस्तानी साखरेची गोदामं पेटवून टाकणार,जितेंद्र आव्हाडांचा सरकारला इशारा