निर्भया प्रकरणी सुप्रीम कोर्टात दोषींच्या पुनर्विचार याचिकेवर आज होणार सुनावणी

mit crime

टीम महाराष्ट्र देशा : 16 डिसेंबर 2012 रोजी देशाला हादरवून टाकणा-या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात दोषींच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी होणार आहे . चार मे रोजी निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दोषींच्या पुनर्विचार याचिकेमुळे निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे दोषींची फाशीची शिक्षा कायम राहणार का? की त्यांच्या शिक्षेला पुन्हा पूर्णविराम लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश आर भानुमती आणि अशोक भूषण यांनी दोषी विनय, पवन आणि मुकेश यांच्या पुनर्विचार याचिकेवर निकाल राखून ठेवला होता. मात्र दोषी अक्षयने पुनर्विचार याचिका दाखल केली नाही.

दरम्यान,दोषींना फाशी दिल्यानंतरच देशाला दिलासा मिळेल, अशी भावनाही निर्भयाच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पवन आणि विनय यांच्याकडून त्यांच्या पुनर्विचार याचिकेवरील युक्तिवाद पूर्ण झाला होता. पण अक्षयकडून पुनर्विचार याचिका उशिरा दाखल करण्यात आली. त्यामुळे त्यावर युक्तिवाद झाला नाही. त्यामुळे युक्तिवाद सादर करणे बाकी आहे, असे बचाव पक्षाचे वकील ए पी सिंह यांनी सांगितले. तर मुकेशचे वकील एम एल शर्मा यांनी पुनर्विचार याचिका दाखल करून युक्तिवादही केला आहे.

काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?
अल्पवयीन दोषीसह सहा जणांनी 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार केला होता. तसेच निर्भया व तिच्या मित्राला अमानुष मारहाणही केली होती. यानंतर या दोघांना विवस्त्र रस्त्यावर फेकून त्यांच्यावर बस चालवण्याचा प्रयत्न केला.काही दिवसांनंतर निर्भयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निर्भया प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. साकेत येथील फास्ट ट्रॅक कोर्टाने चारही आरोपींना सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी ठरवलं. चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा नक्की केल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे सोपवण्यात आले. चारही आरोपींनीदेखील शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने 13 मार्च 2014 रोजी चारही आरोपी अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेश यांच्या याचिका फेटाळून लावल्या आणि फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केला.

त्या नराधमांनी माझ्या  छकुलीला बुधवारीच मारल आणि न्यायालयाने शिक्षा देखील बुधवारीच सुनावली

लोणी मावळा बलात्कार व खून प्रकरणी ३ आरोपींना फाशीची शिक्षा

Loading...

ब्रेकिंग: कोपर्डी अत्याचार प्रकरणी तिन्ही आरोपींना फाशी

Loading...