भाजप-सेना युती झाली तर त्यासमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही : पाटील

कोल्हापूर : पालघर निवडणुकीपासून ते कालच्या शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकीपर्यंतचा निकाल पाहता भाजप आणि शिवसेना युती झाली तर त्यासमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही हेच स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निकालानंतर प्रतिक्रियाविचारल्यानंतर पाटील यांनी या तीन निवडणुकांचा आढावा घेताना पाटील यांनी दावा केला आहे.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील
पालघर निवडणुकीपासून ते कालच्या शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकीपर्यंतचा निकाल पाहता भाजप आणि शिवसेना युती झाली तर त्यासमोर कुणाचाही टिकाव लागणार नाही. आम्ही दोघेही एकत्र आलो की खंबीर आणि स्थिर सरकार देवू शकतो. पालघरच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या मतांची बेरीज केली तर ती कुठच्या कुठे जाते. त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीत विरोधी लढूनही एकूण ७ जागांपैकी भाजप शिवसेनेने ५ जिंकल्या. कालच्या निवडणुकीतही विरूध्द लढूनही भाजप शिवसेनेने ४ पैकी ३ जिंकल्या. हे गणित पाहिल्यानंतर युतीसमोर कुणीही शिल्लक रहात नाही.