fbpx

प्रणव मुखर्जी यांच्यानंतर आता रतन टाटा जाणार संघाच्या व्यासपीठावर

मुंबई – गेल्या महिन्यात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचालक मोहन भागवत आणि उद्योगपती रतन टाटा पुढील महिन्यात एकाच मंचावर येत आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कोणी स्वातंत्र्यसैनिक आहे का? केजारीवालांचा खोचक प्रश्न

संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पालकर स्मृती समितीच्या वतीने हा कार्यक्रम 24 ऑगस्टला आयोजित करण्यात आला आहे. माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिरात हा कार्यक्रम होत आहे. संघाचे प्रचारक नाना पालकर यांच्या स्मरणार्थ ही स्वयंसेवी संस्था स्थापन झाली आहे.

२०१४ मध्ये संघावर केलेली टीका राहुल गांधींना भोवली

टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या आवारात समितीचे कार्यालय असून, ही समिती कर्करुग्णांना मदत करते.याआधी 29 डिसेंबर 2016 रोजी रतन टाटा यांनी नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला अचानक भेट दिली होती.

लष्कराला वेळ लागू शकतो, मात्र संघाचे स्वयंसेवक तीन दिवसांमध्ये लढण्यासाठी तयार होतील – मोहन भागवत