वाकडी घटनेवरुन राहुल गांधींची भाजप आणि संघावर टीका

टीम महाराष्ट्र देशा- संघ आणि भाजपच्या विषारी मनुवादाला विरोध करायलाच हवा. जर असं केलं नाही, तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही, अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गुरुवारी जळगाव येथे मातंग समाजाच्या दोन मुलांना झालेल्या मारहाणीच्या विरोधात राहुल गांधी यांनी ट्वीट करत निषेध व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला काळीमा फासणारी ही घटना जळगाव येथील जामनेर तालुक्यातील वाकडी गावात घडली आहे.मातंग समाजातील काही मुले विहिरीत पोहली म्हणून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातील वाकडी गावात घडलेल्या या घटनेमुळे महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली आहे.

पीडितांकडून या संदर्भात पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. मातंग समाजाच्या तीन मुलांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. मात्र ही तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींकडून दबाव टाकण्यात येतो आहे. विहिरीत पोहल्यामुळे या तिघांची गावातून धिंड देखील काढण्यात आली अशी माहिती समोर येत आहे.

नेमकं काय म्हटलं आहे राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीट मध्ये ?
‘आज माणुसकीदेखील आपली अस्मिता वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आरएसएस भाजपाच्या विषारी राजकारणाविरोधात आपण आवाज उठवला नाही, तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही’.

You might also like
Comments
Loading...