fbpx

अखेर सरकारला आली शेतकऱ्यांची आठवण, मोदी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आज भेटणार

टीम महाराष्ट्र देशा- ऊस-साखर उद्योगाच्या समस्या जाणून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना  भेटणार आहेत. ऊस क्षेत्रासाठी केंद्र सरकारने उचलेली पाऊले आणि उपक्रम याबाबत या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.

ऊस-साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी मागील काही काळात केंद्र सरकारकडून जे उपाय योजण्यात आले आहेत, त्याची माहिती यावेळी पंतप्रधान शेतकऱ्यांना देणार आहेत.महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, पंजाबसह अन्य ऊस उत्पादक राज्यातील दीडशे शेतकऱ्यांशी पंतप्रधान त्यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी भेटतील.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारची मदत अपुरीच – शरद पवार

तोडणीस आलेला ऊस वीज वाहिन्यांच्या स्पार्किंगमुळे जळून खाक

ऊसाच्या अंतिम दरासाठी बुधवारी मुंबईत महत्वपूर्ण बैठक

1 Comment

Click here to post a comment