सांगली : मनसेत वाढती नाराजी, महापालिका निवडणुकीसाठी 78 पैकी एकाही जागेवर उमेदवार नाही

सांगली : सांगलीत मनसेचे इंजिन स्टेशनातून बाहेरच पडले नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीसाठी 78 पैकी एकाही जागेवर उमेदवार उभा करण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक नेत्यांना अपयश आले आहे.या निवडणुकीच्या निमित्ताने मनसेचे पालिका क्षेत्रातील अस्तित्वच संपुष्टात आले आहे.

शिवबंधन बांधलेले मनसेचे ‘ते’ चार नगरसेवक घर वापसी करणार ?

खुद्द पक्षाचे शहरातील चेहरा म्हणवणारे माजी आमदार नितिन शिंदे व मनसेच्या महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा स्वाती शिंदे, शहराध्यक्ष अमर पडळकर यांनी भाजप व राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागत ‘मनसे’ला जय महाराष्ट्र केला आहे. निवडणुकीपुर्वी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी महापालिका निवडणूक लढणार असे सांगितले आणि तेव्हापासून ते परत इकडे फिरकलेच नाहीत यामुळे देखील मनसेत नाराजी वाढली होती.