दिंडीच्या माध्यमातून तंबाखू मुक्तीची हाक!

पुणे : ‘चला तंबाखू मुक्त महाराष्ट्र घडवूया’ अशी हाक देत, तंबाखू विरोधात जनजागृती करण्यासाठी जाणीव सामाजिक संस्था आणि सलाम मुंबई फाउंडेशन या सेवाभावी संघटनांनी यंदाच्या पालखी सोहळ्यात अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

जाणीव सामाजिक संस्था आणि सलाम मुंबई फाउंडेशन मागील अनेक वर्षांपासून संपूर्ण पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय यांच्या सोबत तंबाखूजन्य पदार्थामुळे मानवी जीवनावर होणाऱ्या दुष्परिणाम याविषयावर जनजागृती करीत आहे.पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेज, महादिद्यालये यातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, तरुण-तरुणी, शिक्षक-प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग यांच्या तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यासंनमुळे शरीरावर होणारे घातक परिणाम तसेच व्यसनांपासून पासून परावृत्त करण्याचे काम मागील अनेक दशकांपासून करीत आहे.

जाणीव सामाजिक संस्था आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे ‘तंबाखू मुक्त महाराष्ट्र दिंडीचे आयोजन मागील काही वर्षापासून करत आहेत. याही वर्षी शनिवार दि.०७ जुलै रोजी तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या अलका चौक पालखी मार्गाने ही तंबाखू मुक्त महाराष्ट्राची दिंडी निघणार आहे.

दिंडीमध्ये विविध सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी, शालेय विध्यार्थी, विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित राहणार आहे. तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम या विषयी फलक, घोषणा, पथनाट्य तसेच पत्रके वाटून जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच तंबाखूजन्य पदार्थाच्या मोकळ्या पाकिटांची प्रतिनिधीक होळी करण्यात येणार आहे. या तंबाखूच्या व्यसनांपासून दूर राहण्याचे आव्हान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ए. बी. नांदापूरकर यांनी केले.

तंबाखूच्या विळख्यातून भाविपिढीला बाहेर काढण्यासाठी सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान जाणीव सामाजिक संस्था आणि सलाम मुंबई फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आषाढीवारीत अन्न सुरक्षा व स्वच्छता अभियान राबविणार- गिरीश बापट

Loading...

वृक्षलागवड बनले आहे मोठे आंदोलन – फडणवीस

Loading...

शासन व संस्थांच्या भागीदारीने महाराष्ट्रात महापरिवर्तन – फडणवीस

Loading...