सरकारने नोटबंदीतून काय साध्य केलं ?;अजित पवारांचा सरकारला सवाल

ajit pawar

पुणे : नोटबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त देशातील जवळपास सगळेच विरोधीपक्ष ‘काळा दिवस’ साजरा करत आहेत. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसने ‘जवाब दो’ आंदोलन करत सरकारच्या या निर्णयाचा जोरदार निषेध केला आहे.सरकारने जनतेला कर्जबाजारी केलं असून समाजातील कोणताही घटक समाधानी नाही .सरकारने नोटबंदीतून काय साध्य केलं ? असा सवाल उपस्थित करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं.

पुण्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढला होता त्यावेळी अजित पवार यांनी सरकारवर चांगलंच तोंडसुख घेतलं. अजित पवार म्हणाले,केंद्र आणि राज्य सरकार कोणालाही न विचारता निर्णय घेतात आणि ते निर्णय फ़सतात तसेच सहकार मोडित काढण्याचा सरकारचा डाव असल्याची टिका देखील पवार यांनी केली . पुण्यात अनेक विकास कामे आम्ही केली आहेत पण आता सगळी कामे ठप्प झाली. या सरकारने जनतेला कर्जबाजारी केलंय, रस्ते खड्यात गेले आहेत. समाजातील कोणताही घटक समाधानी नाही ,जीएसटीमुळे व्यापारी हैराण झाले आहेत. या सरकारने नोटबंदीतुन काय साध्य केलं हे सरकारने सांगावं. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नोटबंदीच्या निषेधार्थ सरकारचे श्राद्ध देखील घालण्यात आलं.