“राजीव गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक फायदा सोनिया गांधींनाच झाला”

टीम महाराष्ट्र देशा- राजीव गांधी यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आली असेल, याचा तपास केला पाहिजे, अशी मागणी करत भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी थेट सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राजीव गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक फायदा सोनिया गांधींनाच झाला असल्याचा खळबळजनक दावा देखील स्वामी यांनी केला आहे.  माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना माफ करण्याच्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला आहे.

नेमकं काय म्हणाले स्वामी ?

सर्वोच्च न्यायालयाने नलिनीला मृत्यूदंड ठोठावला होता. त्यांनी (गांधी कुटुंब) राष्ट्रपतींना पत्र लिहून तिला आजीवन कारावास देण्याची मागणी केली. त्यांच्या (राहुल) वक्तव्यावरून संपूर्ण कुटुंबावर संशय येतो. राजीव गांधी यांच्या हत्येचा सर्वाधिक फायदा सोनिया गांधींना झाला होता.

जेव्हा सर्वोच्च न्यायालय यावर विचार करत असेल आणि भारत सरकारने सक्त भूमिका घेतली असेल नेमके त्याचवेळी असे वक्तव्य करणे याचाच अर्थ त्यांचा एलटीटीईशी काही संबंध असू शकतो. कदाचित राजीव गांधी यांची हत्येसाठी सुपारी दिली असेल. याचा तपास केला पाहिजे. राजीव गांधी काय त्यांची ‘प्रॉपर्टी’ आहे का, असा सवाल करत ते देशाचे पंतप्रधान होते. त्यामुळेच त्यांची हत्या झाली.

तुरूंगात फक्त नातेवाईकांना कैद्याशी भेटू दिले जाते. त्या कोणत्या नातेवाईक आहेत ? सोनिया गांधींनी नलिनीच्या मुलीचा इंग्लंडमधील शिक्षणाचा सर्व खर्च उचलला आहे. त्यांच्यावर एवढी दया का दाखवली जात आहे ?