‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’

टीम महाराष्ट्र देशा : सपा आणि बसप एकत्र आल्याने उत्तर प्रदेशमधील राजकारणाला नवीन वळण लागणार आहे. त्यांनी काँग्रेसशिवाय आघाडी केली आहे.ज्या राज्यातून कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी निवडून येतात त्या राज्यातील पक्षांना त्यांना सोबत घेण्याची गरज वाटत नाही,त्यामुळे आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाहीत असे ट्विट माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे.

सत्ताधारी भाजपविरोधात सर्व विरोधीपक्षांच्या महाआघाडीची मोट बांधण्यासाठी कॉंग्रेसकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, कधीकाळी कट्टर विरोधक असणारे अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांनी एकत्र येत नव्या आघाडीच्या स्थापनेची घोषणा आज केली आहे. त्यामुळे देशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणाऱ्या उत्तरप्रदेशमध्ये कॉंग्रेस महाआघाडीला सुरुंग लागला आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी ट्विट केले. ते ट्विट मध्ये म्हणतात, ‘ज्या राज्यातून काँग्रेसचे अध्यक्ष निवडून येतात त्याच राज्यात त्यांना सोबत घेण्याची गरज वाटत नाही. जेव्हा राहुल गांधींना पंतप्रधान होता आलं असतं तेव्हा झाले नाहीत आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही.’

You might also like
Comments
Loading...