पंढरपूर – मोदी सरकार विरोधात आपल्या भाषणातून टीकेचे आसूड ओढणाऱ्या भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आंबेडकर यांनी हेतुपरस्पर मोदी सरकारची बदनामी केल्याच्या कारणावरून येथील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात आंबेडकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
भारिपच्या वतीने चार जुलै रोजी सोलापुरात हुतात्मा मंदिर येथे झालेल्या जाहीर सभेत आंबेडकर यांनी केलेल्या भाषणात मोदी सरकार विरोधातील आरोप हे समाजहिताचे नव्हते. त्यांनी जाणीवपूर्वक केलेल्या आरोपांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारची बदनामी झाली आहे, असे वाईकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी करून आंबेडकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सत्तेच्या हव्यास असलेल्या लोकांनी देशावर आणीबाणी लादली – पंतप्रधान
मंदसौर बलात्कार : बलात्कार करणाऱ्यांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही