fbpx

‘ कुलभूषण जाधवशी पाकिस्ताननं आतंकवाद्याप्रमाणेच वागावं’

naresh-aggarwal-

टीम महाराष्ट्र देशा- पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना आतंकवादी घोषित केलं आहे त्यामुळे पाकिस्तानने त्यांच्याशी आतंकवाद्याप्रमाणेच व्यवहार करायला हवा असं संतापजनक विधान समाजवादी पार्टीचे नेते नरेश अगरवाल यांनी केलं आहे.अगरवाल यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर चोहोबाजूने टीका व्हायला सुरुवात झाली आहे.

कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचे सांगलीतील असून, सध्या मुंबईत वास्तव्यास आहे.कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे.‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.