विधानपरिषद निवडणुक:मुख्यमंत्री -उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा

मुंबई : पुढील महिन्यात 7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे आणि याच जागेसाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा म्हणून भाजप-शिवसेनेत वाटाघाटीही सुरु झाल्या आहेत.शिवसेनेची भूमिका अद्याप समोर आली नसली, तरी नारायण राणेंच्या उमेदवारीला त्यांचा विरोध आहे, हे उघड असल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे विधानपरिषद पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता धूसर झाली आहे.तर आता भाजपनं आपल्या उमेदवारांसाठी चाचपणी सुरु केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्त्या शायना एनसी आणि प्रसाद लाड या तिघांची नावं उमेदवारीसाठी चर्चेत आहे. मात्र यांच्यापैकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Loading...

पुढील महिन्यात 7 डिसेंबर रोजी विधानपरिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात फोनवरुन चर्चा झाली. मात्र शिवसेनेची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.या निवडणुकीत भाजपकडून राणेंच्या ऐवजी दुसरा उमेदवार दिला तर शिवसेना पाठींबा देईल असा अंदाज वर्तवला जात आहे मात्र राणेंची हि संधी हुकली तर पुन्हा संधी मिळेपर्यंत राणेंचा मंत्रिमंडळातील प्रवेशही लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही.Loading…


Loading…

Loading...