“तटकरेंकडून राजकीय बदला घेतल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही”

congress ncp

टीम महाराष्ट्र देशा- सुनील तटकरे यांनी सलग तीन वेळा आमची फसवणुक केली आहे. याचा राजकीय बदला घेतल्या शिवाय आम्ही गप्प बसणार नाही, मग पक्षाने कारवाई केली तरी चालेल .राज्यात जरी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडी झाली तरी अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघात अशी आघाडी होणार नाही अशी घणाघाती टीका कॉंग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केली आहे. ते बेलोशी ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे आणि शेकापचे आमदार सुभाष पाटील हे देखील मंचावर उपस्थित होते.

Loading...

काय म्हणाले माजी आमदार मधुकर ठाकूर ?

राज्यात जरी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकाप आघाडी झाली तरी अलिबाग मध्ये होणार नाही. मग पक्षाने आमच्यावर कारवाई केली तरी चालेल. जे जयंत पाटील रोह्यात जाऊन तटकरेंच्या विरोधात मोर्चे काढत होते. ते आज एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरत आहेत. त्या आरोपांचे पत्रिकांचे काय झाले हे अजुन कळलेल नाही.राष्ट्रवादीच्या धोरणामुळे जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत झाली.गेल्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी अलिबाग मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले. ठाकूर कुटूंबातील १० सदस्य गावागावात जाऊन तटकरे यांचा प्रचार करत होते. यामुळे अलिबाग मतदारसंघातून तटकरे यांना २० हजारांचे मताधिक्यही मिळाले. यावेळी कुरुळ येथे झालेल्या सभेत तटकरे यांनी मला शब्द दिला, सहा महिन्यांनतर होणारया विधानसभा निवडणुकीत याची परतफेड केली जाईल, आदिती तटकरे यांनी जिराड येथे झालेल्या सभेत असेच आश्वासन दिले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत तटकरे दोघांनी आमची फसवणुक केली. आम्ही चार वेळा त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी भेटही दिली नाही. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत याचा राजकीय बदला घेतल्या शिवाय गप्प बसणार नाही असा थेट इषारा मधुकर ठाकूर यांनी दिला.Loading…


Loading…

Loading...