देशविरोधी घोषणा : 3 वर्षांनी आरोपपत्र दाखल होणार

नवी दिल्ली : कन्हैया कुमार, उमर खलिद यांच्या अडचणीत येणाऱ्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे. जवाहरलाल नेहरू विश्व विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य तसेच इतर काही जणांविरूद्ध देशद्रोहा प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

कालच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तपासणी पूर्ण केली असून, पूर्ण रिपोर्ट दिल्ली पोलीस आयुक्तांना सादर केला. आज हा अहवाल कोर्टात सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

9 फेब्रुवारी 2016 रोजी कन्हैया कुमारच्या नेतृत्त्वात जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे. जेएनयू कॅम्पसमध्ये विनापरवाना कार्यक्रम घेऊन देशविरोधी घोषणाबाजी झाल्याचा आरोप आहे.