माझ्या टेबलावर फाईल असती तर मराठा समाजाला कधीच आरक्षण दिलं असतं : पंकजा मुंडे

बीड- मराठा आरक्षणाची फाईल माझ्या टेबलवर असती तर मी विलंब न लावता त्यांना आरक्षण दिले असते, असे वक्तव्य ग्रामविकस मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. पंकजा मुंडे यांनी गुरुवारी परळीत ठिय्या आंदोलन करणाऱ्या मोर्चेकऱ्यांची भेट घेतली यावेळी बोलताना मुंडे यांनी हे वक्तव्य केलं .

एका बाजूला मुख्यमंत्री मराठ्यांना आरक्षण देण्यात टाळाटाळ करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. परंतु आता भाजपाच्या पंकजाताई मुंडेंनीच मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिला असल्याचं बोललं जात आहे. शिवरायांची शपथ घेऊन सांगते, माझ्याकडे फाईल असती तर मराठ्यांना झटक्यात आरक्षण दिलं असतं, असं पंकजाताई मुंडे म्हणाल्या आहेत. . मागील आठ दिवसांपासून परळी तहसील कार्यालयाच्या परिसरात मराठा क्रांती मोर्चातर्फे ठिय्या आंदोलन सुरू आहे.

पंकजा मुंडे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे-

  • मी मराठा बांधवांची दूत बनणार असून, मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानपर्यंत जाणार
  • मला जातीपातीचं राजकारण करायचं नाही. पण मराठ्यांना आरक्षणा हे मिळालंच पाहिजे
  • आंदोलकांना आरक्षणाची लढाई जिंकायची आहे, यासाठी बलिदान देऊ नका.
  • मराठा समाजाला न्याय देण्याची शासनाची भूमिका आहे. यासाठी विशेष अधिवेशन बोलाविण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांना करू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत.
  • आंदोलनात चूक नसणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असतील तर यासंबंधी गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विनंती करु