भगवा दहशतवाद शब्द वापरून काँग्रेसनं भारताला बदनाम केलं, अमित शहांचा घणाघात

कॉंग्रेसने देशाची माफी मागावी - अमित शहा

टीम महाराष्ट्र देशा- कर्नाटकमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून कॉंग्रेस-भाजप एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नसल्याचं चित्र आहे. दहशतवाद्याला कोणतीही जात, धर्म, पंत नसतो. तो केवळ एक गुन्हेगार असतो. परंतु कॉंग्रेस पक्षाने आजवर भगवा दहशतवाद व हिंदू दहशतवाद असे विभाजन करुन हिंदू धर्मीयांचीच नव्हे तर पार देशाचीही बदनामी केली आहे. अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस पक्षावर निशाना साधला आहे.बंगळूरमध्ये आयोजीत केलेल्या एका सभेत ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले अमित शहा ?
दहशतवाद्याला कोणतीही जात, धर्म, पंत नसतो. तो केवळ एक गुन्हेगार असतो. परंतु कॉंग्रेस पक्षाने आजवर भगवा दहशतवाद व हिंदू दहशतवाद असे विभाजन करुन हिंदू धर्मीयांचीच नव्हे तर पार देशाचीही बदनामी केली आहे.कॉंग्रेसने देशाची माफी मागावी. राजीव गांधी देशाचे पंतप्रधान असताना त्यांनी भाजपाला ‘हम दो हमारे दो’ या शब्दांत हिणवले होते. परंतु आज स्थानिक स्वराज्य संस्थांसहीत देशातील २० राज्यात आमची सत्ता आहे. आणि लवकर भारतीयांनी काँग्रेसमुक्त भारताचे पाहिलेले स्वप्न आपण पूर्ण करु असा विश्वास त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.

You might also like
Comments
Loading...